Pimpri : सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून निवृत्त होणा-या कर्माचा-यांना त्यांच्या कुटुंबीयांनी सन्मानपूर्वक वागणूक द्यावी व त्यांच्या राहून गेलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करावी, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

नोव्हेंबर अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या १२ अधिकारी व कर्मचा-यांचा सत्कार महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह, सेवा उपदान धनादेश सुपूर्द करुन करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. कै. मधुकर पवळे सभागृह, मनपा मुख्य इमारत येथे झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी
समिती सभापती विलास मडीगेरी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाच्या चारुशीला जोशी देखील उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक प्रकाश बने, पुष्पा कुमार, मुख्य लिपिक शांताराम कंधारे, उपशिक्षक छाया ढमाले, शफकतआरा महमंद कुद्सी, मंदाकिनी गायकवाड, मुकादम काशिनाथ देवकर, तर स्वेच्छानिवृत्त होणा-यांमध्ये सहाय्यक शिक्षिका पद्मजा गायकवाड, उपशिक्षिका रत्ना संगमनेरकर, सफाई कामगार
बारींद्र अंदुरकर, रतन लोंढे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.