Chinchwad : दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज –  आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र.18 मधील गुणवंत  इ.१० वी 12 वीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीचा सत्कार भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नगरसेवक सुरेश भोईर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,  कुठल्याही क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि कामात प्रामाणिकपणा असेल तर त्या क्षेत्रात यश हे भेटतच अशा प्रकारे आपण देशाच, राज्याचे, जिल्ह्याचे आणि प्रभागाचे नाव उंच शिखरावर घेऊन जाणार ही अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमला नगरसेवक सुरेश भोईर, स्वीकृत नगरसेवक विठ्ठल भोईर, महावितरण समितीचे मधुकर बच्चे,  माजी नगरसेविका  कांता मोंढे, मुद्रा लोन सदस्य संजीवनी पांडे  श्रीराम परबत आदी उपस्थित होते. तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ  झाला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.