BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : खराळवाडी, कामगारनगर भागात चाबुकस्वार यांच्या पदयात्रेला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या प्रचारार्थ आज सकाळी खराळवाडी, कामगारनगर व गांधीनगर भागात भव्य पदयात्रा काढण्यात आली.

सकाळी अकरा वाजता खराळवाडी येथील खराळआई मंदिरापासून पदयात्रेला सुरूवात झाली. रिपब्लिकन पक्षाचे लक्ष्मण गायकवाड, विकास कांबळे, भारत पुंडे, रघुनाथ सोनटक्के, दिनेश म्हस्के, संभा वाघमारे, बंडू वाघमारे, शरद साबळे तसेच सेना-भाजपचे कार्यकर्ते मोठया संख्येने उमेदवार ॲड. चाबुकस्वार यांच्यासमवेत होते. संपूर्ण खराळवाडी, गीता माता मंदिर परिसर, कामगारनगर, व गांधीनगर भागातून पदयात्रा काढण्यात आली.

HB_POST_END_FTR-A2

.