Pimpri News: गृहनिर्माण सोसायटी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील जलतरण तलाव उद्यापासून सुरू

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने टप्प्या-टप्प्याने निर्बंंधामध्ये शिथिलता दिली जात आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायटी, क्लब, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील जलतरण तलाव उद्या (मंगळवार) पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्यांसाठीच ही मुभा राहील. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

कोरोनामुळे मागील पावणे दोन वर्षांपासून शहरातील सर्व जलतरण तलाव बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंच्या सरावासाठी मागील मंगळवारपासून जलतरण तलाव सुरू करण्यात आले होते.

आता शहरातील गृहनिर्माण सोसायटी, क्लब, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील जतरण तलाव उद्यापासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्यांसाठीच ही मुभा राहील. दोन्ही डोस झाले असल्याची खात्री करण्याची जबाबदारी जलतरण तलाव व्यवस्थापनाची राहील. पुढील आदेशापर्यंत हे आदेश लागू राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.