Dagadusheth Halwai Ganapati Trust : राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2019 चा निकाल जाहीर; भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळ प्रथम;विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी बक्षीस वितरण

एमपीसी न्यूज –  पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने सन 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा कोरोना महामारीमुळे रखडलेला निकाल आज (शनिवारी) जाहीर करण्यात आला.भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळाला 51 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.तर, सातत्याने पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येणा-या सात मंडळांना ‘जय गणेश भूषण पुरस्कार’ जाहीर झाला.याबाबतची माहिती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांनी दिली.

बक्षिस वितरणाचा कार्यक्रम येत्या गुरुवारी (दि.18) पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे.निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, सरचिटणीस माणिक चव्हाण, विश्वस्त अमोल केदारी, समन्वयक अनिल वाघेरे राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.ट्रस्टमार्फत 2019 मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील129 मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामधून 109 गणेश मंडळे बक्षीसासाठी पात्र ठरली आहेत. या मंडळांना 13 लाख 1 हजार रुपयांच्या रोख बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे.

या स्पर्धेत चिंचवड स्टेशन येथील यशस्वी मित्र मंडळ द्वितीय, जाधववाडी-चिखलीतील सुभाष मित्र मंडळ तृतीय, आकुर्डी गावठाणातील नागेश्वर मित्र मंडळ चतृर्थ आणि चिंचवडगावातील अखिल मंडई मित्र मंडळाने पाचवा क्रमांक पटकाविला आहे. या मंडळांना रोख रक्कम आणि चषक देण्यात येणार आहे. सातत्याने पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येणा-या सात मंडळांना ‘जय गणेश भूषण पुरस्कार’ आणि 10 हजार रुपयांचे बक्षीस देऊन स्पर्धेतून निवृत्त केले जाणार आहे. त्यामध्ये भोसरी लांडगे आळीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ,  निगडी गावठाणातील जय बजरंग तरुण मंडळ, निगडी, प्राधिकरणातील जय हिंद मित्र मंडळ, चिंचवड येथील एस के एफ मित्र मंडळ, गांधीपेठ तालीम मित्र मंडळ, काळभोरनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळ आणि भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळ या मंडळांचा समावेश आहे.

ही स्पर्धा प्रभागनिहाय घेण्यात आली.प्रथम क्रमांकाला 25 हजार, द्वितीय 22 हजार 500, तृतीय 20 हजार, चतृर्थ 17 हजार 500, पाचव्या क्रमांला 15 हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे.’अ’ प्रभागात आकुर्डी गावठाणातील भैरवनाथ मित्र मंडळाचा प्रथम क्रमांक आला आहे. तर, आकुर्डी, विठ्ठलवाडीतील श्रीकृष्ण क्रांती मंडळ, रुपीनगर मधील दक्षता तरुण मंडळ, एकता मित्र मंडळ, चिंचवड रामनगर येथील परशुराम मित्र मंडळांना अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला आहे. ‘ब’ प्रभागात चिंचवडगावातील नवतरुण मित्र मंडळ, चिंतामणी मित्र मंडळ, श्री लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळ, उत्कृष्ट तरुण मंडळ आणि मोरया मित्र मंडळ ट्रस्ट यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला आहे.

‘क’ प्रभागात भोसरीतील श्रीराम मित्र मंडळ, आझाद मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ आणि कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ यांचा अनुक्रमे  पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला आहे. तर, ‘ड’ प्रभागात पिंपरीतील अमरदीप तरुण मंडळ, थेरगावातील सम्राट मित्र मंडळ, पिंपरीतील शिवराजे प्रतिष्ठान, जुनी सांगवीतील आनंदनगर मित्र मंडळ आणि वाकड येथील उत्कर्ष मित्र मंडळाचा अनुक्रमे  पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक आला आहे.

जिवंत देखावे सादर करणा-या 15 मंडळांना 10 हजार रुपयांचे बक्षीस

जिवंत देखावे सादर करणा-या 15 मंडळांना 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यात पिंपरी, संत तुकारामनगर येथील सिद्धिविनायक प्रतिष्ठान, चिखलीतील वीर अभिमन्यून फ्रेंड सर्कल, श्री हनुमान व्यायाम मंडळ, श्री शिवछत्रपती मित्र मंडळ, पिंपळेगुरव येथील अनंतनगर तरुण मित्र मंडळ, खंडोबा माळ मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, थेरगावातील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, रुपीनगर येथील क्रांती ज्योत मित्र मंडळ, काळेवाडीतील ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ, थेरगावातील आनंद पार्क मित्र मंडळ, क्रांतिवीर मित्र मंडळ, दिघीरोडचे नरवीर तानाजी तरुण मंडळ, रहाटणीतील सेवन स्टार स्पोटर्स क्लब आणि चिंचवड, रामनगर येथील त्रिमूर्ती मित्र मंडळाचा समावेश आहे.

उत्कृष्ट स्थिर देखाव्याचे 5 मंडळांना 15 हजार रुपयांचे बक्षीस

उत्कृष्ट स्थिर देखाव्याचे 5 मंडळांना 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यात मोशीतील शिवशंभो प्रतिष्ठान, भोसरीतील नवज्योत गणेश मित्र मंडळ, कै. भगवान गव्हाणे तरुण मित्र मंडळ, नव महाराष्ट्र तरुण मंडळ आणि पिंपरी अजमेरा कॉलनीतील एकता मित्र मंडळाला बक्षीस देण्यात येणार आहे. महोत्सवर्षी वर्ष असलेल्या आकुर्डीतील गणेश कामगार मंडळ आणि चिंचवडगावातील श्री मयुरेश्वर मित्र मंडळाला 15 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. पर्यावरणीय देखावे करणा-या प्राधिकरणातील संतनगर मित्र मंडळ, नवी सांगवीतील नवी सांगवी विभागीय मित्र मंडळाला आणि वैज्ञानिक देखावा करणा-या चिंचवडगावातील ज्ञानदिप मित्र मंडळाला 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

Rotary Club : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीने जवानांसह अनोखे रक्षाबंधन

स्थिर व हलते देखावे करणा-या 20 मंडळाला 10 हजार रुपयांचे बक्षीस

स्थिर व हतले देखावे करणा-या 20 मंडळाला 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यात भोसरीतील लोंढे तालीम मित्र मंडळ, भोजेश्वर मित्र मंडळ, खंडोबा मित्र मंडळ, श्रीकृष्ण तरुण मंडळ, फुगे माने तालीम मंडळ, छत्रपती श्री शिवाजी तरुण मित्र मंडळ, माळीआळी मित्र मंडळ, चिखलीतील श्री संत सावता माळी तरुण मंडळ, श्री संत सावता माळी पेठा, हिंदवी स्वराज्य युवा मंच, पिंपरी अजमेरातील शिवप्रेमी तरुण मंडळ, संत तुकारामनगर येथील सेवा विकास मित्र मंडळ, पिंपरीगावातील आझाद मित्र मंडळ, डी वॉर्ड फ्रेंड सर्कल, स्वराज्य प्रतिष्ठान, चिंचवड स्टेशन येथील हनुमान तरुण मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, काळेवाडीतील मोरया कॉलनी तिरंगा मित्र मंडळ, जुनी सांगवीतील सार्थक सोशल फाऊंडेशन, पिंपळेगुरव येथील शिवराय मित्र मंडळ आणि जागृती मित्र मंडळाचा समावेश आहे.

उल्लेखनीय देखावे सादर करणा-या 20 मंडळांना 5 हजार रुपयांचे बक्षीस

उल्लेखनीय देखावे सादर करणा-या 20 मंडळांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. त्यात चिखली आहेरवाडीतील जय बजरंग मित्र मंडळ, जाधववाडीतील नवचैतन्य मित्र मंडळ, जुनी सांगवीतील बालाजी प्रतिष्ठान, राही माई संयुक्त शिव मित्र मंडळ, मधुबन मित्र मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ, नवी सांगवीतील शिवप्रतिष्ठान, कासारवाडीतील आझाद मित्र मंडळ, जाणता राजा ग्रुप, दापोडीतील जय हनुमान युवा प्रतिष्ठान, तळवडेतील नवयुग मित्र मंडळ, सिंहगर्जना मित्र मंडळ, क्रष्णा कोयना भैरवनाथ सेवा प्रतिष्ठान, चिंचवड मोहननगर येथील श्री गणेश मित्र मंडळ, वाकड भुमकर चौकातील जय बजरंग तरुण मित्र मंडळ, काळेवाडीतील आझाद मित्र मंडळ स्पोटर्स क्लब, ताथवड्यातील नरसिंह तरुण मंडळ, निगडी प्राधिकरणातील स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, आकुर्डी गावठाणातील सिद्धिविनायक मित्र मंडळ आणि पिंपरी भारतनगर येथील जान्हवी फाउंडेशन यांचा समावेश आहे.

विद्युत रोषणाईचे देखावे करणा-या 5 मंडळांना 5 हजार रुपयांचे बक्षीस

विद्युत रोषणाईचे देखावे करणा-या 5 मंडळांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. त्यात मोरवाडीतील नवयुग तरुण मंडळ, रावेत येथील गणेश मित्र मंडळ, पुनावळेतील अमर तरुण मंडळ, ताथवडेतील सम्राट मित्र मंडळ  आणि पिंपळेनिलख येथील शिव सिद्धी प्रतिष्ठानचा समावेश आहे. तर, गृहनिर्माण सोसायटीत देखावे करणा-या 5 सोसायट्यांना 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यात रावेत येथील अक्का ब्लयू हाउसिंग सोसायटी, संतोष ड्रीम सोसायटी, सिल्वर ओक ए अंड विंग को-ऑफ सोसायटी, पिंपळेगुरव येथील फिनिक्स ग्लोबल फाउंडेशन,  चिंचवड येथील भक्ती पॅरेडाइज युवा मित्र मंडळ, पिंपरीतील साई कम्फर्ट को-ऑप सोसायटी आणि निगडी, प्राधिकरणातील शुभम युवक मित्र मंडळ यांचा समावेश आहे.

कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी म्हणाले, ”कोरोना महामारीमुळे दोनवर्षे स्पर्धा झाली नाही. यंदा स्पर्धा होणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. उत्कृष्ट देखावे सादर करावेत”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.