Pimpri News: महापालिकेच्या लघुफिल्म, गीत, चित्रकला, पथनाट्य, भित्तीचित्र स्पर्धेचे निकाल जाहीर

 एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान अंतर्गत स्वच्छ लघुफिल्म, गीत (जिंगल), चित्रकला, पथनाट्य, भित्तीचित्र स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे. माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे. नागरिकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. याकरिता स्वच्छ गीत, चित्रकला, पथनाट्य अशा विविध स्पर्धां आयोजित करण्यात आल्या होत्या.

प्लास्टीक बंदी, कचरा विलगीकरण, परिसर स्वच्छता, कमी वापर, पुनर्वापर, पुर्नचक्रीकरण, स्वच्छता विषयक लघुफील्म, गीत. चित्रकला, पथनाट्य, भित्तीचित्र अशा स्पर्धा घेतल्या होत्या. त्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात आले आहेत.

गीत (जिंगल) स्पर्धेत डॉ. माया मिंडकर, राकेश पाचांगे आणि ओम झुंझुरके अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक, चित्रकला स्पर्धेत आर्या चव्हाण प्रथम क्रमांक, सुष्टी पाटील, आदित्य चौधरी द्वितीय आणि अथर्व शिर्के याचा तृतीय क्रमांक आला.

पथनाट्य स्पर्धेत परिक्षित कुंभार प्रथम क्रमांक, केशवनगर महापालिका शाळा द्वितीय, खिंवसरा पाटील शिक्षण संस्था, मंजुरीबाई प्राथमिक शाळा दिघीचा तृतीय क्रमांक आला. लघुफील्म स्पर्धेत केशवनगर महापालिका शाळा प्रथम क्रमांक (ब क्षेत्रीय कार्यालय), आकाश भोकमुरकर प्रथम क्रमांक (फ क्षेत्रीय कार्यालय), अर्चना मोरे द्वितीय क्रमांक (इ क्षेत्रीय कार्यालय) आणि मातृ विद्यालय स्कूल तृतीय क्रमांक (ब क्षेत्रीय कार्यालय).

तर, भित्तीचित्र स्पर्धेत अभिनव कला महाविद्यालायाच प्रथम क्रमांक आला. प्रथमेश वाकडे द्वितीय, पोर्णिमा कडू हिचा तृतीय क्रमाक आला आहे. या विजेत्यांना क्षेत्रीय कार्यालयातर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.