DK To BCCI : सात नंबरची जर्सी रिटायर करा ; दिनेश कार्तिकची बीसीसीआयला विनंती

Retire the number seven jersey; Dinesh Karthik's request to BCCI.

एमपीसी न्यूज – महेंद्रसिंग धोनी याने भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती घोषित केली त्यानंतर त्याच्यावर शुभेच्छा आणि भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद देणाऱ्या प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. भारतीय संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यांनीदेखील महेंद्रसिंग धोनी याला शुभेच्छा देत बीसीसीआयला अनोखी विनंती केली आहे.

यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने धोनीसोबत 2019 विश्वचषकादरम्यानचा आपला फोटो पोस्ट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

धोनीसोबत आतापर्यंत अनेक चांगल्या आठवणी माझ्या नेहमी लक्षात राहतील. मला आशा आहे की बीसीसीआय त्याची 7 नंबरची जर्सी कायमस्वरुपी रिटायर करेल असे त्यांने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे.

महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याचा वारसदार कोण, ही चर्चा ऐरणीवर आहे.

सध्या यष्टिरक्षकाच्या जागेसाठी के एल राहुल आणि ऋषभ पंत हे दोघे प्रमुख दावेदार असतील, तर तिसरे स्थान संजू सॅमसनला असेल, असे मत नयन मोंगिया, एमएसके प्रसाद आणि दीप दासगुप्ता या माजी यष्टिरक्षकांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.