Chinchwad News : महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विलास जगताप यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे  सेवानिवृत्त उपअभियंता विलास मारुती जगताप (वय 61) यांचे आज (शनिवारी) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात  पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

विलास  जगताप यांनी महापालिकेच्या बांधकाम,पाणी पुरवठा,जलनि:स्सारण इत्यादी विभागात काम केले. तसेच चिंचवड येथील महात्मा फुले मंडळाचे  ते पदाधिकारी होते.

चिंचवडगाव येथे वास्तव्यास असलेल्या जगताप यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. दुपारी दीड वाजता चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.