kothrud: निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पाटील यांचे निधन

एमपीसी न्यूज – मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे. ए. तथा जयपाल अमृतराव पाटील (वय – 78) यांचे  कोथरूड येथील निवासस्थानी  आज (मंगळवार) दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  पुण्यातील सहायक पोलीस आयुक्त सुरेन्द्रनाथ देशमुख यांचे ते मामा होत.

न्या. जयपाल पाटील यांचे मूळगाव बेळगाव होते. पुणे येथे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केले होते.  उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना आदर्श घोटाळा चौकशी आयोग, पेण अर्बन बँक घोटाळा चौकशी आयोगात त्यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.