Pimpri News: सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांचा अनुभव व शिकवण ही महापालिका कर्मचा-यांना प्रेरणा देईल – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्ती ही निवृत्ती नसून ती जगण्याची नवी आवृत्ती आहे. तसेच सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांचा अनुभव आणि शिकवण ही महापालिका कर्मचा-यांना सतत प्रेरणा व मार्गदर्शन करीत राहील असे प्रतिपादन महापौर उषा ढोरे यांनी केले.

महापालिकेच्या वतीने माहे मे 2021 मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या 118 आणि सेवानिवृत्ती घेतलेल्या 8 कर्मचा-यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहे मे 2021 मधील सेवानिवृत्तांचा कार्यक्रम घेता आली नाही. तो नुकताच संपन्न झाला.

यावेळी उपमहापौर हिरानानी घुले, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सुप्रिया सुरगुडे, गणेश भोसले,तुकाराम गायकवाड आदी उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार निवृत्त झालेल्यांमध्ये मुख्य उद्यान अधिक्षक प्रकाश गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे, लेखाधिकारी प्रकाश नेरकर, महादेव शेंडगे, असिस्टंट मेट्रन स्मिता शेटे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, मुख्याध्यापक हनुमान दळवी, उपअभियंता स्थापत्य शशिकांत दवंडे, सहा.आरोग्याधिकारी संजय कुलकर्णी.

भांडारपाल मोहन जगताप, मुख्य लिपिक राजेंद्र परळीकर, नंदकुमार जगताप, संपत भारती, पंढरीनाथ गुंडाळ, भिमराव खाडे, जालिंदर नागवडे, सुभाष पवार, तेजश्री आल्हाट, लव धुमाळ, वाहन चालक अरुण रणपिसे, राजाराम लांडगे, सुरेश गायकवाड, गुंडुराव देसाई, राजाराम चौरे, संजय जाधव, उपलेखापाल सोमनाथ साबळे, स्टाफ नर्स मंजूळा अलफोन्सो, जयश्री जाधव, रंजना गोरे, फार्मासीस्ट दत्तात्रय माने, राजेंद्र वाणी, कनिष्ठ अभि., स्थापत्य मोहन पोरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दिपक शेडगे, फिटर संजीवन खरात, गाळणी निरिक्षक माया सोनवणे, रमेश भालेराव, आया सुलोचना रायकर, जेसी फ्रान्सीस यांचा समावेश आहे.

स्वेच्छानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये शिपाई अनंत घाडीगाकर, सफाई कामगार संगिता हुबळीकर, लक्ष्मी शिंदे, अर्जुन जाधव, सुरेखा भागवत, शशिकला यादव, मुकादम गोरोबा म्हेत्रे, संजीवनी पुन्ने यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.