Chinchwad : झील फॅशन शो मध्ये रेवती लोंढे यांनी पटकावला झील मिसेस महाराष्ट्र 2019 किताब

राज्यस्तरीय स्पर्धा : विविध वयोगटातील स्पर्धकांचा सहभाग

एमपीसी न्यूज- झील या सामाजिक संस्थेच्या वतीने चिंचवड येथे राज्यस्तरीय ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भोसरी संतनगर मधील रेवती रुपेश लोंढे यांनी झील मिसेस महाराष्ट्र २०१९ या किताबावर आपले नाव कोरले.

चिंचवड येथील कायराइड हॉटेल येथे झालेल्या स्पर्धेसाठी विविध शहरांमधून 47 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात इंडो वेस्टर्न, टॅलेंट, ब्रॅंड वॉक, क्‍युए अशा विविध फेऱ्या पार पडल्या. या स्पर्धेमध्ये अनुष्का हारके, सिद्धी हाम्बीर, तश्‍वी गुप्ता, प्रगती तरडे, मनस्वी गायकवाड, मयुरेश मते, शौर्य दुसाने, अनुजा हारके, श्रीयांषू जाधव, सारथा गोरे, उन्नती सिसोडिया, माधुरी देसाई, दिशा रोकडे, पायल बाविस्कर, सुरेश भराडे, चिन्मय पाचपांडे, जगत जगती, रिया मोहन, अनुष्का पाचपांडे, कोमल जाधव, दिव्या तुपे, साधन सोनवणे, सरिता अगरवाल यांनी विविध वयोगटातून पारितोषिके पटकाविली.

स्मिता बेलसरे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. पिया रॉय, रुपाली सावंत, राजश्री गागरे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. प्रेम गाडा व राज म्युझिक व डान्स अकॅडमी यांच्याकडून विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. ड्रेस डिझायनर म्हणून अर्णव आवरे, रोहिनी मोरे, तेजस बोबाडे यांनी तर शमा धुमाळ यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम पाहिले.

हेमा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. गौरव वानखेडे, श्रावणी गावडे, ओजल गजबकर, सानिका जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन स्विटी गोसावी, अविनाश गोसावी, राजेश आवले, किरण चव्हाण, संतोष क्षीरसागर, जय पटेल, विरेंद्र मंडी, जयसिंग परदेशी, स्वप्नील शिंदे, परेश वैद्य, सोनू आडके यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.