Pravin Tarde : अभिनेते प्रविण तरडे यांची रविवारी प्रकट मुलाखत

एमपीसी न्यूज – दिशा सोशल फाऊंडेशच्या वतीने प्रसिद्ध लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम येत्या रविवारी 15 मे रोजी चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध मुलाखतकार विनोद सातव हे प्रविण तरडे (Pravin Tarde )यांची मुलाखत घेणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अभिनेते रमेश परदेशी (पिट्या भाई), देवेंद्र गायकवाड (दया) या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले यांनी दिली आहे.
Pune News : भारतीय स्त्रियांचा त्याग जगात महान! – शंकरराव गायकर
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. मात्र, काही जागा राखीव असतील. नाट्यगृहात मर्यादित आसन क्षमता असल्याने प्रथम येईल त्यास प्राधान्याने प्रवेश या तत्वाने नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार आहे.