Pune : 12 टक्के मिळकतकरवाढ फेटाळली, स्थायी समितीचा पुणेकरांना दिलासा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकतेच 2020 – 21 चे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये पुणेकरांवर 12 टक्के मिळकतकरवाढ लादण्यात आली होती. ही करवाढ गुरुवारी स्थायी समितीने फेटाळून लावली. त्यामुळे एक प्रकारे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वीच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी कोणतीही पुणेकरांवर करवाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

_MPC_DIR_MPU_II

मिळकतकरवाढी संदर्भात निर्णय घेण्यासाठी खास सभा घेण्यात आली. या बैठकीत ही दरवाढ फेटाळण्यात आली. महापालिका प्रशासनाने करवाढ न करता थकबाकी वसुली आणि इतर पर्यायावर लक्ष देण्यास सांगण्यात आले. ही करवाढ रद्द केल्याने महापालिका आयुक्तांचे बजेट 160 कोटींनी कमी झाले आहे. आयुक्तांनी 6 हजार 229 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. तर, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेसाठी 15 टक्के करवाढ होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.