Pune : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील नुकसान झालेल्या पिकांची उद्या करणार पाहणी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी उद्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करणार आहेत. इंदापूर, बारामती, मावळ तालुक्यांत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. पाटील यांच्या दौऱ्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. पण, रोख मदत कधी मिळणार? हा प्रश्न आहे. येत्या 5 नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 दिवसांत आर्थिक मदत मिळणार असल्याचा विश्वास पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांच्या पुणे जिल्हा दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणखी जोराने काम करणार आहे. राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत करणार असल्याचे जाहीर केले. त्यातील पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मदत मिळणार याची उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.