BNR-HDR-TOP-Mobile

चित्रपट “ झांगडगुत्ता , सादरीकरणात कमी पडला

PST-BNR-FTR-ALL

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- गावचा विकास व्हावा असे प्रत्येक गावातील लोकांना वाटत असते, पण त्यासाठी गावातील सर्वच माणसांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असते, काही जणांचे विचार इतरांना पटत नाहीत, गावाचा विकास होत नाही, विचारांचा सावळा-गोंधळ होतो आणि त्याचवेळी विचित्र परिस्थिती निर्माण होते अश्याच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित निर्माते पवन शेठ, मोरेश्वर संखे यांनी फुटप्रिंट मिडिया एन्टरटेनमेंट या चित्रपट संस्थेतर्फे “ झांगडगुत्ता “ ची निर्मिती केली असून ह्या सिनेमाची प्रस्तुती व्हिजन कॉर्पोरेशन लिमिटेड ची आहे. लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांचे असून सचिन अंधारे यांच्या गीताला बबली हक यांनी संगीत दिले आहे, यामध्ये जयंत सावरकर, किशोरी शहाणे-विज, संजय खापरे, जयवंत वाडकर, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, नागेश भोसले, माधवी जुवेकर, विजय कदम, किशोर चौगुले, अंशुमाला पाटील, असे अनेक कलाकार आहेत.

हि कथा दरसवाडी या गावात घडते, या गावाचा विकास होत नाही, पण तरीही आहे त्या परिस्थितीत गावातील माणसे आनंद मानत जीवन जगत असतात. गावात कसलीच सोय नाही, गावात एकदाच एसटी येते आणि जाते. त्याच गावात दत्तू नावाचा पोस्टमन आपली नोकरी सांभाळून गावासाठी काही करता येईल का यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असतो. अण्णांच्या तत्वनिष्ठ स्वभावामुळे त्यांच्या दोन्ही मुलीने पळून जाऊन लग्न केलेलं असते.

गावात अशोकराव पाटील नावाचे पुढारी दरवर्षी पक्ष बदलून आमदार होण्यासाठी निवडणूक लढवीत असतात, पण त्यांना यश मिळत नाही. नामदेव नावाचा मुलगा लग्नाळू मुलगा लग्नाला उभा असतो एक दिवस त्याला मुलगी पसंत पडते त्यांचे वऱ्हाड गावात येते आणि त्याच दिवशी अण्णांचा अचानक मृत्यू होतो, आणि पुढे काय घडते ते तुम्हीच पाहून ठरवा,,,

सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका मनापासून केल्या आहेत, पण पटकथा फसलेली आहे, चित्रपट गती घेत नाही, कथा-कल्पना ठीक असली तरी ती सादरी करण्यात गोंधळ उडालेला जाणवतो, चित्रपट परिणाम साधण्यास कुठेतरी कमी पडलेला आहे हे दिसून येते.

आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मेलेल्या माणसाचा सुद्धा विचार करीत नाहीत, गावाच्या विकासाचे श्रेय घेण्यासाठी पुतळे उभारतात त्यातून स्वार्थ कसा साधता येईल ह्या मानसिकतेवर सिनेमा भाष्य करतो. एकंदरीत चित्रपट परिणाम किती साधेल हे प्रेक्षकच ठरवतील.

.

HB_POST_END_FTR-A1
.