Pimpri : पिंपरीमध्ये वीजविषयक कामांचा आढावा

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वीजविषयक विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयात समितीचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. कार्यकारी अभियंता  शिवाजी वायफळकर व राहुल गवारे यावेळी उपस्थित होते. यावेळी उपरी वीजवाहिन्या भूमिगत करणे, फिडर पिलरी दुरुस्ती करणे, सुरळीत वीजपुरवठा, वीजग्राहकांना अचूक रिडींगनुसार व वेळेत वीजबिल देणे, वीज चोरी विरोधात मोहीम आदींसह विविध कामांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीमध्ये प्रमोद कुटे, समीर जवळकर, गणेश लंगोटे, शैलजा मोरे, तुषार हिंगे, अश्विनी चिंचवडे, अभिजित गोफण, नीता बैस – परदेशी आदी सदस्य चर्चेत सहभागी झाले त्यांनी ग्राहक सेवा तसेच इतर कामांबाबत विविध सूचना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.