Thergaon : थेरगाव येथील क्रांतीवीर चापेकर विद्यामंदिर येथे क्रांतीदिन उत्साहात

एमपीसी न्यूज –  क्रांतीवीर चापेकर विद्यामंदिर येथे 9 ऑगस्ट क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.  शाळेतील चापेकर यांच्या पुतळ्यास हार घालून विद्यार्थ्यांची फेरी ढोल-ताशाच्या गजरात व वंदे मातरम! भारत माता की जय! चापेकर बंधूंचा विजय असो! क्रांतिकारकांचा विजय असो! अशा घोषणा  दिल्या.

चापेकर यांच्या पुतळ्यास शालेय समिती अध्यक्ष गतीराम भोईर यांच्या हस्ते पुष्पहार घातला. विद्यार्थ्यांनी चापेकर यांच्या पुतळ्यास वंदन केले व संपूर्ण वाड्याचे अवलोकन केले. तेथे शाहूनगर येथील अभिषेक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक  उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सुधाकर हांडे या शिक्षकांनी चापेकर बंधूंच्या कार्याची माहिती सविस्तर सांगितली.  सविता पाठक या शिक्षिकेने 9 ऑगस्ट क्रांतीदिन का साजरा करण्यात येतो विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी उठो जवानो देश के, वसुंधरा पुकारती| हे समूहगीत गाऊन संपूर्ण वातावरण देशभक्तीमय केले.

शालेय समिती अध्यक्ष गतीराम भोईर यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांचे स्मरण फक्त आजच करू नका तर दररोज करा. तसेच आई-वडील व गुरुजन यांचा आदर राखा, शिस्तीचे पालन करा, कुठलेही काम करताना प्रामाणिकपणे करा. असा मोलाचा सल्ला दिला. अभिषेक विद्यालयाच्या शिक्षकांचे शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दिपाली नाईक यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन पुष्पा जाधव, मंजुषा गोडसे, शामला वाघमारे, गणेश शिंदे या शिक्षकांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.