Sushant Rajput Case: रिया चक्रवर्तीची नऊ तास चौकशी

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची आता सीबीआयमार्फत चौकशी होणार आहे. त्याचबरोबर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी सक्तवसुली संचालनालय(ईडी) करत आहे. शुक्रवारी सुमारे नऊ तास रियाची चौकशी करण्यात आली. सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा व त्याच्या पैशांची हेराफेरी केल्याचा आरोप असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आहे.

तसेच बिहार पोलिसांनी सुप्रीम कोर्टात म्हटले की, रियाने सुशांतच्या मानसिक आजाराचे खोटे चित्र रंगवले होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे. सुशांतचे पैसे हडपण्याचा तिचा हेतू होता. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात रियाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याआधारे सुशांतच्या खात्यातून 15 कोटींच्या हेराफेरीबाबत ईडीने 31 जुलैला रियाविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला.

ईडीने रियाकडे तिच्या आणि सुशांतसोबतच्या व्यवहारांची चौकशी केली. गुंतवणूक, करार व संपर्काबाबतही तिला प्रश्न विचारले. दरम्यान, केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत रियाचा खटला मुंबईला हस्तांतरित करण्याच्या प्रकरणात आम्हालाही पार्टी बनवण्याची विनंती केली. बिहार पोलिस सुप्रीम कोर्टात म्हणाले हो​​ते की रियाने सुशांतच्या आजाराचे खोटे चित्र रंगवले

कॉल डिटेल्सनुसार, रिया व बांद्राचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्यात ४ वेळा फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. रियाने 21 जूनला डीसीपीला फोन करून 28 सेकंद चर्चा केली. 22 जूनला डीसीपीने रियासाठी मेसेज दिला. त्यानंतर डीसीपीने 22 तारखेलाच रियाशी फोनवर 29 सेकंद चर्चा केली. 8 दिवसांनंतर पुन्हा डीसीपीने रियाला फोन केला, दोघांत 66 सेकंद चर्चा झाली.

बिहार सरकारने सुशांत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल केले. त्यात म्हटले आहे की, मुंबईत दाखल झालेला गुन्हा सुशांतच्या मृत्यूचा आहे. पण बिहार पोलिस सुशांतच्या फसवणुकीची आणि ब्लॅकमेलिंगची चौकशी करत आहेत. बिहार पोलिसांना त्याची चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुंबईत दावा दाखल करण्याची रियाची याचिका रद्द करावी.​

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.