Rhea interrogated by NCB: रियाची एनसीबीकडून सहा तास चौकशी

रिया अटक होण्यासाठी तयार आहे. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे गुन्हा असेल, तर रिया शिक्षा भोगण्यास तयार आहे. ती निर्दोष आहे, त्यामुळेच तिने बिहार पोलिस, सीबीआय, ईडी आणि एनसीबीचा सामना केला.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात सीबीआय, ईडीपाठोपाठ नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) रविवारी रिया चक्रवर्तीची 6 तास चौकशी केली. रिया दुपारी 12 वाजता एनसीबीच्या कार्यालयात आली होती. आजही (दि.7) रियाची चौकशी होणार आहे. एनसीबीने रविवारी सकाळी रियाच्या घरी जाऊन समन्स बजावला होता.

ड्रग्स केसमध्ये आतापर्यंत सुशांतचा हेल्पर दीपेश सावंत, अब्दुल बासित, जैद विलात्रा, शौविक चक्रवर्ती (रियाचा भाऊ), सॅमुअल मिरांडा आणि अब्बास लखानीला ताब्यात घेतले आहे. कैजान इब्राहिमलाही अटक झाली होती, पण शनिवारी त्याला जामीन दिला.

कोर्टाने रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा हाउस मॅनेजर सॅमुअल मिरांडाला 4 दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे. ड्रग्स प्रकरणात सुशांतचा घरगडी दीपेश सावंत सरकारी साक्षीदार होण्यास तयार असल्याची माहिती समोर आली असून याची प्रक्रिया आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी रियाचे वकील सतीश माने-शिंदे म्हणाले, ‘रिया अटक होण्यासाठी तयार आहे. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे गुन्हा असेल, तर रिया शिक्षा भोगण्यास तयार आहे. ती निर्दोष आहे, त्यामुळेच तिने बिहार पोलिस, सीबीआय, ईडी आणि एनसीबीचा सामना केला. ‘

सीबीआय टीमने शनिवारी एम्सच्या डॉक्टरांसोबत सकाळी सुशांतच्या फ्लॅटवर जाऊन तपास केला. तेथे दीड तास फ्लॅटची व्हिडिओग्राफी करण्यात आली. वृत्तांनुसार, सीबीआय अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा क्राइम सीनचे नाट्य रुपांतर केले. सीबीआय टीमसोबत सुशांतची बहीण मीतू सिंह, कुक नीरज व केशव, फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी हेही होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.