Rhea Reaches at DRDO Guest House: रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून चौकशीसाठी सुरु

रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे अनेक प्रश्न तयार आहेत. सुशांतचा स्वयंपाकी नीरजने सीबीआयला दिलेल्या जबाबात काही प्रश्न रियापर्यंत आणून ठेवले आहेत.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिला अखेरीस सीबीआयकडून समन्स जारी करण्यात आलं आहे. या प्रकरणात तिची आज चौकशी होणार आहे. रिया चक्रवर्तीला सीबीआयनं आज चौकशीसाठी बोलावलं आहे. आज मुंबईत डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये तिची चौकशी होईल. यासाठी रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये माहिती आहे. रियासोबत तिचा भाऊ शौविक देखील आहे.

यावेळी सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा देखील सीबीआय चौकशीसाठी डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, दीपेश सावंत आणि कुक नीरज यांची बऱ्याचदा चौकशी केली आहे. ब-याच दिवसांपासून रिया आज चौकशी होणार की उद्या याची अटकळ बांधली जात होती. अखेरीस आज सीबीआय सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी करणार आहे.


सीबीआयकडून काल रियाला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे अनेक प्रश्न तयार आहेत. सुशांतचा स्वयंपाकी नीरजने सीबीआयला दिलेल्या जबाबात काही प्रश्न रियापर्यंत आणून ठेवले आहेत.

आता त्या प्रश्नांची उत्तरं रियाला विचारण्यात येणार आहेत. दीपेशने आपल्या जबाबात ज्या गोष्टींमध्ये रियाचं नाव घेतलं होतं. आता त्यासंदर्भात रिया प्रश्न विचारण्यात येणार आहेत. सिद्धार्थ पिठानीनेही रियाबाबत काही खुलासे केले आहेत. त्यासंदर्भात आता रियाला प्रश्न विचारण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.