Rhea Shares Messages: आपल्या समर्थनासाठी रियाने शेअर केले तिचे आणि सुशांतचे चॅटिंग

Rhea shared her and Sushant's chatting for support सुशांतच्या कुटुंबीयांनी रियानेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतरच रियाने हे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्या समर्थनार्थ तिचे आणि सुशांतचे मेसेज व्हायरल केले आहेत. सुशांत आणि तिच्यात सुशांतची बहीण प्रियांका संदर्भात अनेक चॅट झाली आहेत. त्याचे स्क्रीनशॉट रियाने शेअर केले आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियानेच सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतरच रियाने हे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

रियाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये सुशांत त्याच्या बहिणीबद्दल रियाकडे तक्रार करताना दिसत आहे. यातील मजकुरानुसार, ‘माझी बहीण माझ्या मित्रांना आणि रुममेट असणाऱ्या सिद्धार्थ पिठाणीला माझ्याविरोधात भडकवत आहे’, असं सुशांत रियाला सांगत आहे. मात्र, यात सुशांत रिया आणि तिचा भाऊ शौविक यांच्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करत असल्याचे दिसून येते.

‘तुझं कुटुंब एकदम भारी आहे. शौविक अगदी साधा आहे आणि तू सुद्धा. तू माझी आहेस. माझ्या मधील बदलाचे तू कारण आहेस. तू मला प्रत्येक वेळी मार्ग दाखवतेस. या सर्व बदलांमागे तुझा हात आहे.

तुमच्यासारखी लोकं माझ्या जवळ आहेत ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तुमच्यासारखी लोकं मला मित्र म्हणून आनंद देतात’, असं सुशांतने म्हटल्याचे या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे.

या पुढील मेसेजमध्ये सुशांतने ‘तू हसताना खूप छान दिसतेस. तशीच तू मला आवडतेस. मी आता झोपण्याचा प्रयत्न करत आहे. अपेक्षा आहे की मला छान स्वप्नं पडतील. हे स्वप्न एकदम अद्भुत असेल का? बाय’, असं म्हटलं आहे.

‘हा हा.. झोप तू.. विमान उतरल्यानंतर मी तुला कॉल करते आणि अपेक्षा आहे तू चंद्रावर लॅण्ड करशील. झोप तू स्वीट बॉय’, असा रिप्लाय यावर रियाने दिला आहे.

त्यानंतर रियाने सुशांतची चौकशी करण्यासाठी मेसेज केला. त्यावर सुशांतने ‘फारसा ठीक नाहीये मी. माझी बहीण सिडला भडकवत आहे. (तू आणि मी जी गोष्ट मागे सोडून आलो आहे) त्यावरुन लक्ष विचलित करुन मी तिला तिच्या वागणुकीसाठी शिक्षा केल्याचे म्हणत आहे. हे खूपच निराशाजनक आहे’, असा रिप्लाय केला.

सुशांतने प्रियंकाला पाठवलेला मेसेज रियाला पाठवल्याचे दिसत आहे. यामध्ये तो लिहितो, ‘(प्रियंकासाठी) दारुच्या नशेमध्ये केलेल्या छेडछाडीनंतर तू व्हिक्टिम गेम खेळत असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेस. तर माझ्या लाडक्या बहिणीला मी इतकंच सांगू इच्छितो की, तिथे वर आपली लाडकी आई आणि देव आहे.

ज्यांनी मला शिकवलं आहे, त्याप्रमाणे तू एक गुन्हा केला आहेस. तर तुला तुझ्या अहंकारामुळे काही दिसतच नसेल तर देवच तुझं भलं करो. मी कोणाला घाबरत नाही आणि मी या पुढेही हे काम करत राहणार. मी जगामध्ये नक्कीच बदल घडवत राहणार. देव आणि वेळच सांगेल कोणाचं काम योग्य आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.