Rhea to take Legal Action: रिया करणार सुशांतच्या कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाई

औषधांचे प्रिस्क्रिप्शन बहिणींनी एकमेकींना पाठवले होते. इडी आणि कोर्टासमोर ते खोटे बोलत आहेत. डॉक्टरांचा घेतलेला सल्लासुद्धा बेकायदेशीर होता.

एमपीसी न्यूज – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समजली जाणारी रिया चक्रवर्ती आता सुशांतच्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी करत आहे. सुशांतच्या आजारपणाविषयी कुटुंबातील सदस्यांना माहीत होते, तरीही त्यांनी तपास अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयासमोर खोटी विधाने केली असा दावा तिने केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, रियाचे वकील सतीश माने शिंदे म्हणाले, ‘औषधांचे प्रिस्क्रिप्शन आणि समोर आलेल्या दोन बहिणींच्या चॅटवरुन सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या आजारपणाविषयी सर्वकाही माहीत होते. त्यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्ट आणि इडीला खोटे जबाब दिले आहेत’.

सतीश माने शिंदे पुढे म्हणाले, ‘औषधांचे प्रिस्क्रिप्शन बहिणींनी एकमेकींना पाठवले होते. इडी आणि कोर्टासमोर ते खोटे बोलत आहेत. डॉक्टरांचा घेतलेला सल्लासुद्धा बेकायदेशीर होता. ऑनलाइन सल्ला घेतला असला तरी रुग्णाचा इतिहास माहीत असल्याशिवाय डॉक्टर औषधे लिहून देत नाहीत. त्यामुळे रिया याविरोधात कारवाई करणार आहे.’

यापूर्वी रविवारी सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि त्याची मोठी बहीण मीतू सिंह यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले. सुशांत डिप्रेशनमध्ये होता हे त्याच्या बहिणीला माहीत होते हे चॅटमधून दिसून येते. या चॅटमध्ये श्रुतीने डॉक्टरांचा नंबर आणि सुशांतला लिहून दिलेल्या औषधांची नावेही मीतूला सांगितली आहेत. या चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये श्रुतीशी बोलताना मीतू स्वत: डॉक्टरांना भेटण्याविषयी म्हणाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.