Pune : ऱ्हीदम वाघोलीकर, रचना खडीकर -शहा यांना ‘राष्ट्रीय कला गौरव ‘ पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज- भारतीय पत्रकार संघ आणि कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने युवा लेखक ऱ्हीदम वाघोलीकर ( पुणे ) , रचना खडीकर -शहा ( मुंबई )यांना ‘ कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम कुसुमाग्रज स्मारक, नासिक येथे ११ मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती महेंद्र देशपांडे यांनी दिली.

-हीदम वाघोलीकर आणि रचना खडीकर -शहा यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. रचना खडीकर -शहा या लता मंगेशकर यांची भाची आहेत.

लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते, तर किशोरीताईंवरील पुस्तक ‘स्वरमंङळ ‘ ( इंडियन हार्प ) आकारात प्रकाशित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like