Bhosari : भोसरीमधून रिक्षा आणि दुचाकी चोरीला

Rickshaw and two wheeler stolen from Bhosari area.

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरातून रिक्षा आणि दुचाकी चोरीला गेल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 30) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात आफाक साहिल शेख (वय 30, रा. दापोडी) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांच्याकडे 50 हजार रुपये किमतीची एम एच 12 / क्यू आर 4292 ही तीनचाकी रिक्षा आहे. 26 जुलै रोजी रात्री साडेसात वाजता त्यांनी त्यांची रिक्षा दापोडी गावातील बिकनसेठ पार्क समोर पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी शेख यांची रिक्षा चोरून नेली. 27 जुलै रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

दुस-या प्रकरणात श्रीकांत हनुमंत मुडे (वय 20, रा. महादेव नगर, धावडेवस्ती) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुडे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची एम एच 14 / एच एफ 4997 ही दुचाकी 26 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 27 जुलै रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.