_MPC_DIR_MPU_III

Pimpri : तरुणाचा मोबाईल घेऊन रिक्षा चालक पसार

एमपीसी न्यूज – तरूणाचा 10 हजार रूपयांचा मोबाईल घेऊन रिक्षा चालक पसार झाला. ही घटना पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात 19 जून रोजी घडली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी नारायण विठोबा खाणवे (वय 36, रा. चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच-12, 2308) या क्रमाकांच्या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाणवे 19 जून रोजी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात थांबले होते. त्यावेळी (एमएच-12, 2308) या क्रमांकाच्या रिक्षा चालकाने खाणवे यांच्या खिशातील 10 हजार रूपयांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.