Pimpri : रिक्षा चालकांनी संघटित होणे काळाची गरज : माउली सूर्यवंशी

एमपीसी न्यूज –  प्रत्येक घटक संघटित होत आहे संघटित होऊन संघर्ष केल्यास आपल्या मागण्यांना न्याय लवकर मिळतो, रिक्षा चालकांनी महाराष्ट्र रिक्षा पांचयत संघटनेच्या नेतूत्वाखाली संघटित व्हावे आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करावा ही काळाची गरज आहे,  असे मत सामाजिक कार्यकर्ते माऊली सूर्यवंशी यांनी केले.

चिंचवडनगर वाल्हेकर वाडी येथे  महाराष्ट्र रिक्षा पांचयत संलग्न चिंचवडेनगर रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन माउली सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे फैजदार सोमनाथ झेंडे, माजी नगरसेवक संदीप चिंचवडे, भारत केशरी विजय गावडे, सामाजिक कार्यकर्ते गजानन चिंचवडे, बाजीराव चिंचवडे, हरीभाऊ चिंचवडे, टेलको युनियन अध्यक्ष शिवाजी शेडगे, योगेश चिंचवडे, संजय येवले, महेश जाधव, महाराष्ट्र रिक्षा पांचयत पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष सोमनाथ कलाटे, प्रल्हाद कांबळे, पोलीस हवालदार सचिन वरणेकर, पोलीस मित्र संघटनेचे मधुकर साठे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र रिक्षा पांचयत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे होते. यावेळी रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे म्हणाले रिक्षा चालकांचे स्थानिक आणि राज्यपातळीवर अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पांचयत काम करत आहे. संघटनेनं रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवल्यामुळे रिक्षा चालक मोठ्याप्रमाणात संघटनेसोबत जोडले जात आहेत. संघटनेचे रिक्षा स्टॅन्ड वाढत आहेत. सर्वात जास्त सभासद असलेली संघटना म्हणून महाराष्ट्र रिक्षा पांचयत नावा रुपाला येत आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष दिनेश चिंचवडे, अशोक डोरे, सूर्यकांत फुगे, कैलास चिंचवडे, अजित विधाते, राजू वाघमारे, अनिल कोळसुने,  यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.