Dehuroad News : रावेतमधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – रावेत मधील शिंदे वस्ती येथे रात्रीच्या वेळी पार्क केलेली तीनचाकी रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री घडली.

प्रकाश साहेबराव शिंदे (वय 30, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. परभणी) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे हे रिक्षा चालक आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी त्यांची 90 हजारांची तीनचाकी रिक्षा (एम एच 14 / जी सी 7442) शिंदे वस्ती मधील मिडटॉन सोसायटी येथे पार्क केली होती. रात्री एक वाजताच्या सुमरास अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.