Pimpri : परिसरातून दोन मोटारसायकलसह रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी आणि पिंपरी परिसरातून दोन मोटारसायकल आणि एक तीनचाकी रिक्षा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारसनाथ लालचंद यादव (वय 31, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव यांनी त्यांची 25 हजारांची एम एच 14 / एफ ए 2004 ही दुचाकी 19 सप्टेंबर रोजी लांडेवाडी मधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागील बाजूस पार्क केली. अज्ञात चोरटयांनी दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

हरमिंदरसिंग गुरमेशसिंग पुल्लर (वय 45, रा. नवी सांगवी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुल्लर यांनी त्यांची 15 हजारांची एम एच 14 / जी जे 8505 ही दुचाकी गुरुवारी (दि. 26) सकाळी सव्वादहाच्या सुमारास समर्थ नगर, नवी सांगवी येथे पार्क केली. दरम्यान, त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.

महंमद रफिक शेख (वय 35, रा. अण्णासाहेब मगरनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांनी गुरुवारी (दि. 26) नेहमीप्रमाणे रिक्षा घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरटयांनी लॉक तोडून रिक्षा पळवून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.