Right Step Foundation : राईट स्टेप फाऊंडेशन देत आहे व्यसनाधिंनांना नवसंजीवनी

एमपीसी न्यूज : राईट स्टेप वेलनेस अँड रिहॅब फाउंडेशन (Right Step Foundation) गेल्या पाच वर्षांपासून व्यसनमुक्तीचा मार्ग प्रशस्त करून व्यसनाधीन व्यक्तींना नवीन जीवन देण्याचे काम करत आहे. एनडीए गेट, कोंढवे धावडे येथे असलेल्या राईट स्टेप व्यसनमुक्ती केंद्राने नुकताच विजयी व्यसनाधीनांचा सन्मान सोहळा पार पडला. आमदार भीमराव तापकीर, मा. सरपंच सुभाष नाणेकर, व्यसन तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर हळीगळे व डॉ.प्रकाश वायकर, उद्योजक तुकाराम इंगळे, युवा नेते प्रसाद कोंडे, नरेंद्र मरळ, उमेश सरपाटील, किरण बारटक्के, सुरेश धावडे, प्रसाद ओक, प्रकाश साळवेआदी उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन साळवे यांनी सुरू केलेले हे कार्य सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत आहे, असे प्रतिपादन प्रख्यात आमदार भीमराव तापकीर यांनी केले. या संस्थेला रुग्णांच्या सेवेसाठी लवकरात लवकर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व मान्यवरांनी यशस्वी व्यसनाधीनांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले.

सर्व मान्यवरांनी (Right Step Foundation) विशेषत: सचिन साळवे यांचे कौतुक केले; ज्यांनी अनेक अनाथ व्यसनाधीन युवकांना या कार्यक्रमात समाविष्ट केले. स्थानिक नेते सुभाष नाणेकर यांनी या प्रतिष्ठानला नियमित सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ.चंद्रशेखर हलीगळे व डॉ.प्रकाश वायकर यांनी उपस्थित रुग्णांना व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. समुपदेशक अभिजित देशमुख यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन निवेदक मदन धायरे यांनी केले तर आभार सुकेष्णी सोनवणे यांनी मानले.

Talegaon News : गाडीखाली म्हैस आल्याने लोकलसह अन्य दोन एक्सप्रेस पुण्याला पोहोचल्या विलंबाने 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.