रविवार, जानेवारी 29, 2023

RTI Day : माहिती अधिकार दिनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असून यादिवशी ‘माहितीचा अधिकार’ या विषयावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विदयापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये ‘माहितीचा अधिकार’ या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित कराव्यात.

Pune Crime : पुण्यात पोलिसांच्या दोन कारवायांमध्ये पावणे दोन लाखांचे अंमली पदार्थ जप्त

स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने समाज सामाजिक कार्यकर्त्याकरीता व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,(RTI Day) चर्चासत्र, व्याख्यानमाला आदी उपक्रम आयोजित करावे. या उपक्रमांसाठीच्या पारितोषिकांची व्यवस्था स्थानिक पातळीवर लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा विविध समाजसेवी संस्थांच्या सहयोगाने करावे. आपल्या कार्यालयातून सदर उपक्रम राबवून माहिती अधिकार कायद्याची व्यापक प्रमाणात राबविण्याबाबत कार्यकाही करावी, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

Latest news
Related news