Pimpri : सराईत गुन्हेगाराला अटक; तीन जिवंत काडतुसांसह पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसांसह एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रावेत येथे केली.

सचिन बबन मिसाळ (वय 32, रा. सिल्वर पाम ग्रो सोसायटी, रावेत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गुन्हेगाराजवळ पिस्तूल आहे. तो सतत त्याच्यासोबत बाळगतो, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सिल्वर पाम ग्रो सोसायटीच्या गेटजवळ सापळा रचून सचिन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल मिळाले. त्यात तीन जिवंत काडतुसे आढळून आली. सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केला. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात पिस्तूल बाळगल्याच्या गुन्हा दाखल आहे. यावरून सचिन याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाच्या प्रयत्नातील फरारी आरोपी अटक

चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार होता. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अक्षय संपत कांबळे (वय 19, रा. दळवी नगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय हा दळवीनगर झोपडपट्टीच्या कमानीजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला चिंचवड पोलिसांकडे हजर करण्यात आले.

गंभीर दुखापतीतील फरारी आरोपीला अटक

निगडी पोलीस ठाण्यातील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. बाळू शंकर उबाळे (वय 35, रा. बौद्ध विहार जवळ, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याला चिकन चौक ओटास्किम येथून अटक केली असून पुढील कारवाई साठी निगडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार किरण लांडगे, राजू केदारी, अजय भोसले, प्रमोद वेताळ, संतोष बर्गे, पोलीस नाईक सचिन उगले, आशिष बोटके, अमित गायकवाड, पोलीस शिपाई प्रमोद हिरळकर, सागर शेडगे, विशाल भोईर, गणेश सावंत, प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.