Pune : ‘रिपाइं’च्या कार्यकर्त्यांचा रविवारी भव्य मेळावा

एमपीसी न्यूज – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) वतीने येत्या रविवारी (दि. ८ सप्टेंबर २०१९) कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजिला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, फायर ब्रिगेडच्या पाठीमागे, गंज पेठ येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार असल्याची माहिती ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली.

बाळासाहेब जानराव म्हणाले, “शहरात पक्ष संघटन मजबूत करण्यासह आगामी विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करून सर्व कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीच्या कामासाठी जबाबदाऱ्या निश्चित करून देणे व त्यांच्यात नवचैतन्य, उत्साह निर्माण करण्यासाठी हा मेळावा आयोजिला आहे. शहराध्यक्ष अशोक शिरोळे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी, तर बाबुराव घाडगे स्वागाध्यक्षपदी असणार आहेत. मेळाव्याला उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, एम. डी. शेवाळे, गंगाधर आंबेडकर, हनुमंत साठे, परशुराम वाडेकर, शशिकला वाघमारे, प्रियदर्शनी निकाळजे, अशोक कांबळे, ऍड. आयुब शेख, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, ऍड. मंदार जोशी, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, स्वीकृत नगरसेवक संजय कदम, नगरसेविका सुनीता वाडेकर, फरझाना शेख, हिमाली कांबळे, सोनाली लांडगे आदी मार्गदर्शन करणार आहेत.”

“मेळाव्यात झोपड्पट्टीधारकास घर देणे, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या देणे, कंत्राटी कामगारांना कायम करून घेणे, मागासवर्गीयांचा बँक लॉग भरणे, पूरग्रस्त व झोपडपट्टीधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणे, भूकंप, आग लागणे, पुरामुळे होणारे नुकसान यासाठी शासनाने कायमस्वरूपी धोरण ठरवावे, या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत करण्यासाठी शासनाने धोरण ठरवावे, निराधार, विधवा महिला व अपंगासाठी असणाऱ्या योजनेचा निधी शासनाने त्वरित उपलब्ध करावा, विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी, पूर्वी अनुसूचित जाती – जमातींसाठी असलेले सेवा नियोजन कार्यालय पुन्हा सुरु करण्यात यावे आदी विषयांचा समावेश असणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.