IPL 2021 : दिल्लीच्या कर्णधारपदी ऋषभ पंतची वर्णी  

एमपीसी न्यूज – दिल्ली कॅपीटल्स या आयपीएल संघाच्या कर्णधारपदी ऋषभ पंतची वर्णी लागली आहे. भारत-इंग्लंड दरम्यान एकदिवसीय सामन्यावेळी दिल्लीचा भूतपूर्व कर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली. त्यामुळे तो यावर्षी आयपीएल खेळू शकणार नाही. 

श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदाच्या आयपीएल 2021 मध्ये दिल्लीचं नेतृत्व कोण करणार? याचं उत्तर शोधणं कठीण झालं होतं. मात्र अखेर अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, आर अश्विन यांच्या नावांमधून ऋषभ पंतचं नाव अंतिम करण्यात आलं आहे.
_MPC_DIR_MPU_II

 येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि ‘विराट सेना’ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि धोनी ब्रिगेट चेन्नई सुपर किंग्ज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.