riteish and genelia pledge: जाणून घेऊया रितेश, जेनेलियाचा अनोखा संकल्प

Let's find out Riteish, Genelia's unique resolve रितेश-जेनेलिया यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

एमपीसी न्यूज – एक जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो. या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी, अभिनेत्री जेनेलिया डिसूझा – देशमुख यांनी  एक स्तुत्य निर्णय जाहीर केला. रितेश-जेनेलिया यांनी मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या दोघांनी अवयवदानाची माहिती दिली.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना जेनेलियाने लिहिले, ‘रितेश आणि मी फार आधीपासून अवयवदानाचा विचार करत होतो. पण ते शक्य झाले नव्हते. डॉक्टरदिनाचे औचित्य साधत आम्ही अवयवदान करण्याची शपथ घेत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल डॉ. नोझर शेरिअर आणि फोग्सी यांचे आभार.’

यासाठी इतर लोकांनाही जेनेलियाने आवाहन केले आहे. लोकांनी या स्तुत्य उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना उद्देशून तिने लिहिले आहे, ‘तुम्हाला एखाद्यास सर्वोत्तम भेटवस्तू द्यायची असेल, तर ‘आयुष्य’ हेच ते गिफ्ट आहे. या उपक्रमात तुम्हीही सहभागी व्हा आणि जीवनदान करण्याची प्रतिज्ञा करा, अवयवदान करण्याची शपथ घ्या’ असे आवाहन रितेश-जेनेलिया यांनी केले आहे.

या व्हिडिओत रितेश म्हणतोय, ‘मी आणि जेनेलियाने याबाबत बराच विचार केला, चर्चा केली. दुर्दैवाने ते आतापर्यंत घडू शकले नव्हते. पण एक जुलै रोजी डॉक्टरदिनाचे औचित्य साधून ही घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की, आम्ही दोघांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.