Talegaon : आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी सोमाटणे येथील ऋतुजा मु-हे हिची निवड

एमपीसी न्यूज – येत्या मे महिन्यात दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी भारतीय थ्रो बॉल संघात सोमाटणे येथील ऋतुजा संतोष मुऱ्हे हिची नुकतीच निवड करण्यात आली.

ही निवड नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत करण्यात आली.सोमाटणे सारख्या गावातील मुलगी थेट भारताच्या संघात खेळणार असल्याने तालुक्यात सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे तिला कोणत्याही प्रकारच्या खेळाचा वारसा नाही.घरात कोणीच कधी खेळाडू राहिला नाही तरी अथक परिश्रमाच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे.

म्हणूनच पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडेसाहेबांनी भारतीय थ्रोबाॅल संघात ऋतुजाची निवड झाल्या बद्दल आज शुक्रवार (दि.14) तिचा सत्कार केला व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत देवेंद्र मु-हे, ऋतुजाचे वडील संतोष मु-हे उपस्थित होते.

याविषयी ऋतुजा म्हणाली, माझे स्वप्न या निवडीमुळे साकार झाले आणि या संधीचे मी सोने नक्कीच करणार आहे दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मी चांगली कामगिरी करील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.