Bhosari News : इंद्रायणी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी रविवारी भोसरीत रीव्हर सायक्लोथॉन

एमपीसी न्यूज – अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्टस फॉडेशन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पर्यावरणप्रेमी संस्थां यांच्या संयुक्त विद्यमाने (Bhosari News) इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहिम अभियाना अंतर्गत येत्या (रविवारी) भोसरी गावजत्रा मैदान येथे रीव्हर सायक्लोथॉन भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती कामगार नेते सचिन लांडगे, संयोजक डॉ.निलेश लोंढे यांनी दिली. आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर , रविकिरण घोडके  दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, डॉ. आनंद पिसे, बापू शिंदे, सुनील बेळगावकर,  डॉ अश्विनी वानखेडे, रो. रविकिरण केसरकर, तृतीय पंथी सोनाली दळवी, मोतीलाल तालेरा स्कुल (इंग्रजी माध्यम) च्या मुख्याध्यापिका सीमा शादबार आदी उपस्थित होते.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित रीव्हर सायक्लोथॉन या रॅलीचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकात पाटील, सिने अभिनेते प्रवीण तरडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल  यांच्या हस्ते होणार आहे.(Bhosari News) नदी स्वच्छता ही आजची एक प्रमुख गरज झाली आहे, याला कारण म्हणजे वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच औद्योगिकीकरणांमुळे शहरभर कचरा आणि घाणीचे साम्राज्य वाढत आहे आणि त्याचा आघात आपोआपच नदीवर होत आहे.

या सर्वांचा हा वाढता ताण पडतो तो प्रामुख्याने प्रदूषणावर.. पर्यायाने महानगरपालिकेवर.. या तयार होणाऱ्या कचऱ्यात बऱ्याच गोष्टी रिसायकल करण्यासारख्या असतात. त्या रिसायकल केल्यास नदीत किंवा अन्य ठिकाणी जाणारा कचरा कमी होऊ शकतो. पर्यायाने प्रदूषण कमी करण्यास मदत होते. आपल्याला नदी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे व त्यासाठी सामान्य माणसाला या रिसायकलिंग बद्दल जागे करणे नितांत आवश्यक झाले आहे. म्हणूनच या जनप्रबोधनासाठी या रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.

Maharashtra Election : महापालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता अचूक मतदार याद्या कराव्यात; राज्य निवडणूक आयुक्त

यालाच अनुसरून या वर्षी Recycle, Reduce, Reuse to Save Enviorment हि संकल्पना मांडत आहोत. या विशेष कार्यक्रमांतर्गत प्रत्येक घरापर्यंत पोहचण्यासाठी एक विशेष मोहिम राबवून पिंपरी-चिंचवड शहरामधील सर्व शाळांमध्ये सोसायट्यांमध्ये, कंपन्यामध्ये जावून (Bhosari News) पर्यावरण संवर्धना अंतर्गत सायकल चालवा पर्यावरण वाचवा नदी स्वच्छता या विषयांतर्गत सर्व पर्यावरण प्रेमी जनजागृती करत आहेत. रिव्हर सायक्लोथॉन रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

या अभिनव उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी, पर्यावरण गतविधी, होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र, डॉक्टर्स असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन, वकील संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, माजी सैनिक संघटना, पतंजली योग, महाराष्ट्रातील सर्व सायकल प्रेमी संस्था, सर्व पर्यावरणप्रेमी संस्था, आदींनी पाठींबा दर्शविला असून प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यातील एक रॅली ते लीड करत आहेत.

यावर्षी साधारणपणे 25,000 सायकलिस्ट येतील अशी अपेक्षा असल्याचे आयोजकांनी सांगितले. इंद्रायणी स्वच्छता जनजागृती मोहिम अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या सर्व शाळा व त्यातील विद्यार्थी आणि खाजगी 60 पेक्षा अधिक शाळांमध्ये शालेय स्तरावर चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली.(Bhosari News) यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  त्यामधून विजेत्या विद्यार्थ्यांमध्ये मनपा स्तरावर आंतर शालेय चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यामधील विजेत्यांना रिव्हर सायक्लोथॉन मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. भोसरीयेथील गावजत्रा मैदानावरून सकाळी ठिक 6 वाजता या भव्य रॅलीची सुरवात होईल.

5 किलो मिटर – (लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरीकांसाठी).
गाव जत्रा मैदान लांडगे पेट्रोल पंप ( इंद्रायणी नगर) शांती नगर गाव जत्रा मैदान.

15 किलो मिटर गाव जत्रा मैदान – जय गणेश साम्राज्य क्रांती चौक स्पाईन सिटी माल चौक गवळी माथा गाव जत्रा मैदान.

25 किलो मिटर – गाव जत्रा मैदान  जय गणेश साम्राज्य क्रांती चौक कृष्णा नगर स्पाईन सिटी माल चौक गवळी माथा गाव जत्रा – मैदान.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.