Road Rage : चाकण येथे दारू पिऊन तरुणाने केली गाड्यांची तोडफोड,ओव्हरटेक केले म्हणून गाडीचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज : दारू पिऊन एका तरुणाने दोन गाड्यांची तोडफोड तसेच माझ्या गाडीला ओव्हरटेक का केले असे म्हणत एका अनोळखी व्यक्तीवर हल्ला केला. ही घटना दि.(12 मे) रोजी रात्री १०.45 वाजता मुटकेवाडी चौक, चाकण(Road Rage) येथे घडली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असताना सुद्धा आरोपी  गणेश दिलीप राठोड(वय-26, रा. चाकण) याने दारू पिऊन तरुणाने दोन गाड्यांची तोडफोड(Road Rage) केली. तसेच,माझ्या गाडीला ओव्हरटेक का केले म्हणून एका कार ड्रायव्हरवर हल्ला केला व त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. कार ड्रायव्हरचे नाव अतिश साहेबराव अहंकारे (वय 30, रा.मेंदकरवाडी) आहे.

Pimple Guruv: उधारीचे पैसे मागितले म्हणून कार वॉश सेंटर चालकाला मारहाण

पोलीस अंमलदार गणेश वाडेकर यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे  आरोपीवर भारतीय दंड संहिता 323,504,506 आणि 427 कलमाखाली फिर्याद दाखल केली असून चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.