Metro: मेट्रोतर्फे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या (Metro) कामादरम्यान अवजड यंत्र सामग्रीचा वापर केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. त्याची दुरुस्ती महामेट्रोतर्फे सुरु करण्यात आलेली आहे.

पुणे मेट्रोच्या दोन मार्गिका असून पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट (17.4 किमी) आणि वनाज ते रामवाडी (15.7किमी) या एकूण 33 किमी मार्गांपैकी 25 किमी मार्ग उन्नत आहे. उर्वरित 6 किमी मार्ग भूमिगत आहे. पुणे मेट्रोचा उन्नत मार्ग रस्त्याला असणाऱ्या दुभाजकाच्या जागेत बांधण्यात येत आहे. 25 किमी उन्नत मार्गापैकी 12 किमी मार्गाचे उदघाटन 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. उर्वरित 13 किमी उन्नत मार्गाचे काम मेट्रोतर्फे सुरु आहे.

पुणे मेट्रोच्या कामादरम्यान अवजड यंत्र सामग्रीचा वापर केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. तसेच या वर्षी मोठया प्रमाणात पडलेल्या पाऊसामुळे त्याच्या भर पडली आहे. मेट्रो वेळोवेळी रस्ते दुरुस्त करीत आली आहे. रस्त्यांवरचे खड्डे, ड्रेनेजची दुरुस्ती, मॅनहोलची दुरुस्ती, पाइपलाइनची दुरुस्ती, पादचारी मार्गाची दुरुस्ती हि कामे मेट्रो करीत आली आहे. सध्या वनाझ ते गरवारे, PCMC ते फुगेवाडी आणि RTO ते बंडगार्डन येथील कामे संपली असल्याने तेथील बॅरिकेड हटवून रास्ता पूर्ववत करण्यात आला आहे.

बोपोडी येथे एल्फिस्टन रस्ता ते MSEB चौक आणि एल्फिस्टन रस्ता ते रेल्वे क्रॉसिंग येथील (Metro) रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करण्यात आला आहे. तसेच खडकी येथील खडकी पोलीस स्टेशन ते रेल्वे अंडरपास आणि रेल्वे अंडरपास ते साई मंदिर चौक येथे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. RTO ते रामवाडी या भागामध्ये कल्याणी नगर, बंडगार्डन, पुणे स्टेशन येथे देखील डांबरीकरण करण्याची कामे करण्यात आली आहे.

PCMC ते फुगेवाडी या मार्गिकेमध्ये आहिल्याबाई होळकर चौक, नाशिक फाटा आणि फुगेवाडी येथे डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. डांबरीकरण करताना मॅनहोलची दुरुस्ती करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त जसे जसे मेट्रोचे काम संपेल तसे बॅरिगेट हटवून रस्ता पूर्ववत करण्यात येईल व रस्त्याची कामे हाती घेण्यात येतील. संबधीत प्रकल्पाच्या अभियंत्यांना मेट्रोचे काम संपलेल्या ठिकाणी बॅरिगेट हटवणे किंवा बॅरिगेटमधील रुंदी कमी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरून रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

मेट्रोच्या उन्नत मार्गाचे काम चालू असताना रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरिगेट सुरक्षिततेच्या दृष्ट्टीने लावावे लागतात. अश्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी मेट्रोने 2017 सालापासून ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे. हे ट्रॅफिक वॉर्डन वाहतूक पोलिसांना मदत करून वाहतुकीचे नियोजन करतात. आजमितीस मेट्रोने 272 ट्रॅफिक वॉर्डन शहराच्या विविध भागात मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या ठिकाणी तैनात ठेवले आहेत. सध्या हे ट्रॅफिक वॉर्डन फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट, गरवारे ते सिव्हिल कोर्ट आणि RTO ते रामवाडी येथे वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे काम करीत आहेत. या व्यतिरिक्त मेट्रोने या मार्गांवर जलद कृती दल (क्विक रिस्पॉन्स टीम) तैनात केली आहे. जलद कृती दल या मेट्रोचे काम सुरु असणाऱ्या रस्त्यांवर कोणतीही दुर्घटना झाल्यास त्वरित मदतीसाठी पोहचते. तसेच या भागांत वाहतूक वाढल्यास वाढीव कुमक म्हणून वाहतूक पोलिसांना मदत करत आहे.

नुकतेच मेट्रोने फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या (Metro) उन्नत मार्गावरील व्हायडकतचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या मार्गावरील लोखंडी बॅरिगेट काढण्यात आले आहेत. मेट्रोने वेळोवेळी जेथे जेथे उन्नत मार्गाचे काम किंवा स्थानकाचे काम संपले आहे तेथे तेथे बॅरिगेट काढून रास्ता पूर्ववत करून वाहतूकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होत आहे.

youtube.com/watch?v=SVXKJnqIdsQ

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.