Chinchwad News : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती

एमपीसी न्यूज –  राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, महिंद्रा हेवी इंजिनिअरिंग, (Chinchwad News) चाकण आणि यश फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पथनाट्याद्वारे उपस्थितांमध्ये वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली.

अभियानाचे उद्घाटन वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे, महिंद्रा हेवी इंजिनिअरिंग, चाकण येथील उद्योगसमुहाच्या व्यवस्थापकीय संचालिका  डॉ. चंचल मेडदीया व एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांच्या हस्ते यांनी हवेत फुगे सोडून करण्यात आले.

यश फाऊंडेशनचे रविंद्र पाटील, प्रा. निजी साजन, प्रा. महिमा सिंग, प्रा. गुरुराज डांगरे उपस्थित होते. कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाखाली सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

Pune News : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिका 21 ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नदीवरील पूल बांधणार

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून काळभोर नगर, आकुर्डी येथील खंडोबा चौकात पथनाट्य सादर करून वाहतूक विषयी हातात फलक घेवून घोषणा देत जनजागृती केली. प्रबोधन रॅलीमध्ये 140 विद्यार्थींनी सहभाग नोंदविला सादर केलेल्या पथनाट्याने सर्व उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन प्रा. नीजी साजन यांनी केले. संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी महिंद्रा हेवी इंजिनिअरिंग उद्योग संस्थेच्या व्यवस्थापिका डॉ. चंचल मेडदीया व वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजया कारंडे, यश फाऊंडेशनचे रविंद्र पाटील यांचा सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.