Lonavala : पवनानगर परिसरातील रस्त्याची साईडपट्टी खचली

एमपीसी न्यूज – पवनानगर ते लोणावळा रस्त्यावर असलेल्या पवना धरणाच्या जवळच असलेली टेकडी रस्त्याची साईडपट्टी दुपारी साडेबाराच्या वाजण्यास सुमारास माती व मुरुम ढासळून खोलवर वाहून गेल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला आहे. जेवण ते लोणावळा या रस्त्याचे गेली चार ते पाच महिन्यापासून दुरुस्तीचे काम चालू असून ढासळलेल्या भागाचे काम काही महिन्यापूर्वी झाले असून ऐन पावसाळ्यात या नवीन दुरुस्त केलेल्या रस्त्याची साईडपट्टी ढासळल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत.

लोणावळा ते पौड या रस्त्यासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी टाकण्यात आला असून या रस्त्याचे काम प्रलंबित असून अनेक ठिकाणी मोरी टाकण्याचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी रस्ता व साईडपट्टी बनविण्याचे काम सुरू असून ते अपूर्ण अवस्थेत आहे. त्यातच पावसाला जोरदार सुरूवात झाल्याने काम बंद करावे लागले. काल झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाशेजारील याच रस्त्यावरचा साईडपट्टीचा भाग वाहून गेला आहे. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु ती व्यवस्थित करण्यात आली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विनायक शेलार यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्याचा साईडपट्टीतून पाणी गेल्यामुळे हा भाग ढासळला आहे, लवकरच दुरुस्त करण्यात येईल.

तर मुसळधार पावसामुळे भुशी डॅम ओव्हरफ्लो झाल्याने त्या परिसरात पोलिसांनी पर्यटकांनी जाण्यासाठी मज्जाव केल्याने व आंदर मावळातील पूल पाण्याखाली गेल्याने तेथील ही वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांनी आपला मोर्चा पवनमावळ परिसरात वळवला आहे. त्यामुळे या रसत्यावरुन प्रवास करताना काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.