Lonavala : दहिवलीत घरफोडी; 30 हजाराचा माल लंपास

एमपीसी न्यूज – एकविरा देवीच्या गड पायथ्यालगत असलेल्या दहिवली गावातील एका बंगल्याच्या दरवाजाला असलेले लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सुमारे तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी घर मालक वसंत वैती यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याने वैती यांच्या बंगल्याला असलेल्या ग्रिलचे कुलूप कापत बंगल्यात प्रवेश करुन एक फ्रिज, टिव्ही, डेक साऊंड, सिलेंडर, शेगडी, मिक्सर, टोप, चादरी असा सुमारे 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

भांगरवाडीतून दुचाकीची चोरी 

लोणावळा भांगरवाडी येथील मितांजली गृहरचना संस्थेच्या आवारात उभी केलेली दुचाकी गाडी 27 जुलैच्या पहाटे हँडल लाॅक तोडत चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी चंद्रकांत वाळूंज यांनी काल लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.