Vadgaon Maval : कंपनी परिसरातून सव्वालाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीच्या परिसरातून 1 लाख 23 हजार 250 रुपये किमतीच्या वस्तू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. हा प्रकार 27 डिसेंबर 2017 ते 9 जुलै 2019 या कालावधीत कान्हे येथील महिंद्रा सिस्टम कंपनीच्या परिसरात घडला.

उस्मान महम्मद शेख (वय 30, रा. कान्हे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान्हे गावात महिंद्रा सिस्टम कंपनी आहे. या कंपनीच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी 41 हजार 250 रुपये किमतीच्या लोखंडी कपलॉक, 42 हजार रुपये किमतीच्या 140 लोखंडी लेझर, 20 हजार रुपयांच्या 80 लोखंडी बेसजॉक आणि 20 हजारांच्या 34 लोखंडी जाळ्या असा एकूण 1 लाख 23 हजार 250 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.