BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दुधासाठी दाराला अडकवलेल्या पिशवीतील फ्लॅटची चावी काढून चोरट्याने केली साडेतीन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – दुधासाठी दाराला अडकवलेल्या पिशवीतील फ्लॅटची चावी काढून
साडेतीन लाखांची रोकड लंपास केल्याची घटना एरंडवणा येथील हिमाली
सोसायटीमध्ये घडली. 28 ऑगस्टपासून जवळपास एक महिना हा फ्लॅट बंद होता. या दरम्यान ही चोरी झाली आहे.

याप्रकरणी आशालता कोरे (वय 57, रा.एरंडवणा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशालता यांचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद होता परंतु त्यांनी दुधासाठी दाराला अडकवलेल्या पिशवीत फ्लॅटची चावी ठेवली होती. एका अज्ञात चोरट्याने पिशवीतील चावी काढून कुलूप उघडले व घरातून कपाटामध्ये ठेवलेली साडेतीन लाखांची रोकड लंपास केली.

एरंडवणा येथील हिमाली सोसायटीमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी पुढील
तपास अलंकार पोलिस करत आहेत

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3