Narhe : बंद फ्लॅटचे कुलूप फोडून पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – राहत्या फ्लॅटचे मुख्य दाराचे कुलूप तोडून 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना काल मंगळवारी (दि. 21) सकाळी 9 च्या सुमारास न-हे येथे घडली.  

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना नागरगोजे (वय 27, रा. न-हे) यांच्या राहत्या फ्लॅटचे मुख्य दार कुलूप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने मुख्यदाराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

तरी याबाबत पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.