Chinchwad : भरदिवसा दुचाकीस्वाराला लुटले

एमपीसी न्यूज – चार जणांनी मिळून एका दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी सव्वादहाच्या सुमारास चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ घडली.

राजू मोहन गंभीरे (वय 32, रा. दळवीनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अण्णा अहिवळे, माम्या रणदिवे, महेश पाटोळे, काळ्या रफ्या शेख (सर्व रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास फिर्यादी राजू त्यांच्या दुचाकीवरून चिंचवड रेल्वे स्टेशन येथील रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 16 हजार 200 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. आरोपींनी राजू यांना पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.