Pune : दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज – दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या टोळीला लष्कर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तलवार, दोरी, रामपूरी चाकू अशी धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली.

युसूफ अब्दुल रज्जाक शेख (वय 35, रा. कोंढवा), अब्रार अफजल खान (वय 18), शहादाब मुनिर खान (वय 19), फैजअली शेख (वय 19), सैफअली शेख (18), कदीर शेख (18), आजीम माजीद शेख (18), राहील शेख (18), सर्व रा. कोंढवा, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सर्व अटक आरोपी एम जी रोड कॅम्प पुणे येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजता महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक शॉप येथे दरोड्याच्या तयारीत असताना मिळून आली. त्यांच्याकडून लष्कर पोलिसांनी तलवार, रामपूरी चाकू, दोरी अशी हत्यारे हस्तगत केली. पुढील तपास लष्कर पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.