Pune : सहकारनगर व कोंढवा येथे घरफोडीच्या दोन घटना

सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – सहकारनगर व कोंढवा येथे गेल्या दोन दिवसात दोन घरफोड्या झाल्या. दोन्ही घटनांमध्ये मिळून तब्बल सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सहकारनगर येथील घटनेत कल्याणी गवळी (वय 26, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली. तर कोंढवा येथील घटनेत प्रशांत बंडी (वय 49, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याणी गवळी यांच्या आईचा चव्हाणनगर पद्मावती येथे फ्लॅट आहे. त्या बुधवारी (दि.29) त्यांचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद करून गेल्या होत्या. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोयंडा उचकटून बेडरूममधील लोखंडी आणि लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण एक लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून नेला. कल्याणी यांच्या आई गुरुवारी (दि.30) सकाळी घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे कळाले. कल्याणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस तपास करीत आहेत.

कोंढवा येथे शांतीनगर सोसायटी चौकाजवळ फिर्यादी प्रशांत यांचा फ्लॅट आहे. ते बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांचा राहता फ्लॅट कुलूप बंद करून बाहेर गेले होते. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के आणि रोख रकम असा एकूण एक लाख आठ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरी करून नेला. सायंकाळी सातच्या दरम्यान घरी परतल्यानंतर प्रशांत यांना चोरी झाल्याचे समजले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.