Hinjawadi Crime News : हिंजवडी, निगडी, भोसरी, दिघी परिसरात चोरीच्या आठ घटना, सहा लाख 33 हजारांचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि निगडी व दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. या सर्व घटनांमध्ये चोरटयांनी सहा लाख 33 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पहिल्या घरफोडीच्या गुन्ह्यात अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एक लाख 32 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. महेश अशोक ठाकरे (वय 34, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

दुस-या प्रकरणात अज्ञात चोरट्याने एका सोसायटीच्या पार्किंगमधून महागड्या सहा सायकल चोरून नेल्या. 53 हजारांच्या सायकल चोरी प्रकरणी उदय विष्णू भालेराव (वय 49, रा. बावधन) यांनी फिर्याद दिली. तिस-या घटनेत मारुंजी रोड लक्ष्मी चौकात एका सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. घरातून एक लॅपटॉप आणि मोबाईल फोन असा 20 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शिवानी शिवाजी निकम (वय 23, रा. हिंजवडी, मूळ रा. सातारा) यांनी फिर्याद दिली.

तर चौथ्या घटनेत सुसगाव येथील सनी वर्ल्ड लॉन्स येथे एका महिलेची पर्स चोरीला गेली. त्यात सोन्याचे दागिने, 21 हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि कागदपत्रे असा एकूण एक लाख 70 हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी नागेश्वरप्रसाद रामप्रकाश पाठक (वय 62, रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

भोसरी मधून दोन तर दिघी मधून एक दुचाकी चोरीला गेली आहे. निगडी येथे एका घरफोडीच्या प्रकरणात तीन अनोळखी चोरट्यांनी एका महिलेच्या घरात प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने, दोन मोती सेट, कॅमेरा असा एकूण एक लाख 38 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भारती राजन चौहान (वय 58, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.