Bhosari : घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून 72 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घुसून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे, चांदीचे दागिने, रोकड असा 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगर येथे शुक्रवारी (दि. 31)उघडकीस आली.

याप्रकरणी संतोष गंगाधरराव कुंभार (वय 35, रा. निसर्ग प्राईड अपार्टमेंट, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी कुंभार हे 30 मे रोजी घराला कुलूप लावून गावी गेले होते. घराचे कुलूप तोडून चोरटे घरात घुसले. कपाटातील सोन्याची चैन, सोन्याच्या दोन वेढणी, चांदीचा गणपती, लक्ष्मीची मुर्ती, चांदीचे ताट, दोन ग्लास, रोकड असा 72 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी 31 मे रोजी गावावरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.