Pune Crime News : हडपसर परिसरात जबरी चोरी, 12 लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात घरफोड्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. वाढत्या घरफोड्या रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दररोज शहरातील वेगवेगळ्या भागात घरफोड्या होत आहेत.

पुण्याचा हडपसर परिसरातून पुन्हा एकदा एक जबर घरफोडीचा प्रकार उघडकीस आलाय. चोरट्यांनी तब्बल 12 लाखाचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सुयोग बाबूलाल जाधव (वय 39) त्यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ससाणे नगर येथील प्रतिभा रेसिडेंसी याठिकाणी फिर्यादी यांचा फ्लॅट आहे. 7 एप्रिल रोजी ते नाशिक येथील त्यांच्या मूळ गावी गेले होते. 11 एप्रिल रोजी ते घरी परत आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश करत कपाटात ठेवलेले 28 तोळे सोने व रोख रक्कम असा एकूण 12 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.